पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या जल्लोष साजरा करण्यात आला..!

जय श्रीराम…🚩🚩
शिवशंभो कॉलनी आदर्श नगर किवळे पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या जल्लोष साजरा करण्यात आला
आपले आराध्य, मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सवा निमित्त शिवशंभो कॉलनी किवळे येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण हिंदू समाज एकत्र यावा या उद्देशाने श्री राम नवमी उत्सवाचे आयोजन दिनांक – ६/४/२०२५ वार रविवार रोजी शिवशंभो कॉलनी जय श्री राम चौक या ठिकाणी करण्यात आलेले होते जाती-भेद, प्रांत-भेद, पंथ-भेद, भाषा-भेद, राजकीय पक्ष-भेद व अन्य मत-भेद विसरून हिंदू म्हणून एकत्र येऊन, श्रीरामांच्या भक्तीरसात रमून शिवशंभो कॉलनी मध्ये हिंदूंचे भव्य शक्तीप्रदर्शन घडवून आणले *
शिवशंभो कॉलनीतील सर्व बांधवांनी सहकुटुंब व सह मित्रपरिवार आणि खास करून महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहून श्री राम जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला🙏
आयोजक – समस्त शिवशंभो कॉलनीतील नागरिक
जय श्रीराम..🚩🚩




