ग्राहकांच्या खिशाला कात्री! ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळीच्या दरात वाढ

नवी मुंबई – सणासुदीच्या तोंडावर चणाडाळ शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. डाळीची तूट भासू नये, यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या असल्या, तरी मोठ्या मागणीमुळे दरवाढ सुरू असल्याचे चित्र आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चणा डाळीच्या दरात वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळ महागल्याने गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे.
Advertisement
मागील महिन्यात 70 ते 80 रुपये किलोने विकली जाणारी चणाडाळ आता 100 ते 110 रुपये किलोने विकली जात आहे. अचानक आवक घटल्याने डाळींच्या दारावर परिणाम झाला आहे तसेच दर वाढल्याने ग्राहक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर
Advertisement




