माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला, रात्री नेमकं काय घडलं?

नागपूर – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून, त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यजवळ ही धक्कादायक घटना घडली.

Advertisement

काटोल मतदार संघात अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदार संघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत अनिल देशमुख कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या दिसून येतात.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page