आईचं पार्सल सांगून डिलिव्हरी बॉय अचानक घरात शिरला… पुण्यातील धक्कादायक घटना आली समोर.😮
पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने घरात एकट्या मुलीला पाहिल्यावर पार्सल आल्याचं खोटं सांगत घरामध्ये गेला. त्यानंतर मुलीने आरडा-ओरडा सुरू केला. वाघोली परिसरामध्ये ही घटना घडली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याची ओळख आता बदलताना दिसत आहे. पुण्यात दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून गुन्हेगारीच्या घटनाही वाढत आहेत. अशातच धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी एकट्या मुलीला पाहून डिलिव्हरी बॉयची नियत फिरली, घरात कोणी नसल्याचा त्याने फायदा घेतला. आईचे पार्सल आहे म्हणून सांगत घरात गेला मात्र मुलीने आरडाओरडा केल्याने तिथून पळून गेला. ही घटना वाघोली परिसरात घडली.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पीडित मुलगी कुटुंबीयांसह वाघोली परिसरात राहते, तिची आई बाहेर घरकाम करण्यासाठी जाते. त्यामुळे पीडित मुलगी त्यावेळी घरामध्ये एकटीच होती. त्यावेळी डिलिव्हरी बॉयने तिला घरात एकटी असल्याचा अंदाज घेतला. डिलिव्हरी बॉय घराबाहेर आला. ‘तुमच्या आईच्या नावे पार्सल आले आहे, असे त्याने सांगितले, घरात शिरून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित मुलगी मोठ्याने ओरडू लागली आणि रडू लागली. तेव्हा आजूबाजूचे लोक जमण्याच्या भीतीने डिलिव्हरी बॉय तिथून पळून गेला.
मुलीने आरडाओरडा केल्यावर तिला धमकावून डिलिव्हरी बॉयने फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलीच्या आईने वाघोली (लोणीकंद) पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, संबंधित डिलिव्हरी बॉयविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यासह (पोक्सो) भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




