पीएमपी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव पीएमपी बसने जोरात धडक दिली. त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना भोसरी येथे घडली आहे.
निखिल कैलास कांबळे (वय २२, रा. खरुस, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विशाल कैलास कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीएमपी बस चालक गणेश आदिनाथ वामन (वय ३५, रा. आदर्शनगर, मोशी, मूळ रा. बीड) याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निखिल हे भोसरीतील ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोरील रस्ता ओलांडत असताना चाकण बाजूकडून भोसरीकडे जाणाऱ्या भरधाव बसने त्यांना जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




