काळेपडळ पोलीसांची मोठी कारवाई, अवैध गावठी हातभट्टीवर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे – महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचासंहिताच्या दरम्यान पुणे शहरात अवैध धंदे / वाहतुक यांच्यावर परिणाम कारक कारवाई करण्याबाबत. पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

वरिष्ठांनी दिलेले आदेश / सुचनांप्रमाणे दिनांक २४/१०/२०२४ काळेपडळ तपास पथकातीत अधिकारी व अंमलदार पोलीस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस हवालदार संजय देसाई, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, पोलीस हवालदार परशुराम पिसे, पोलीस हवालदार अमोल काटकर, स्नेहल जाधव, पोलीस शिपाई महादेव शिंदे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार, सद्दाम तांबोळी, पोलीस शिपाई गणेश माने, पोलीस शिपाई. श्रीकृष्ण खोकले हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार, महादेव शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे सचिन कचरावत व मानेश कचरावत हे दोघे आरोपी मिळुन त्याच्या राहत्या घराच्यापाठीमागे गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, दारु काढणेची भट्टी लावून, गावठी हातभट्टी दारु गाळण्याच्या तयारीत आहेत.

Advertisement

त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे मानसिंग पाटील यांच्यासह काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु गाळणार्या दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव १. सतिश प्रकाश कचरावत, वय ४३ वर्षे, रा. संतोषनगर, कंजारभट वस्ती, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे, २ . मानेश प्रकाश कचरावत, वय ३५ वर्षे, रा. सदर असे असल्याचे सांगितले.

सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले एकुण ८७ कॅन व चार चाकी स्विफ्ट गाडी कार असा एकुण ८,७२,०००/- रुपयांचा मुद्देमाल पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक, अमित शेटे हे करीत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page