वाघोलीतील लॅपटॉप चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या, २४४ लॅपटाॅप, दोन टेम्पो जप्त

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाघोलीतील एका नामांकित कंपनीच्या गोदामातून चोरीला गेलेल्या एक कोटी रुपयांच्या लॅपटाॅप चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन टेम्पो जप्त करण्यात आले. सुरेश महादेव कुमार (वय ३५, रा. वाघोली, मूळ उत्तर प्रदेश), शिवाजी जगन्नाथ वसू (वय २७, रा. धानेगाव, छत्रपती संभाजीनगर), कुमुद रंजन झा (वय ३२, रा. वाघोली ) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

Advertisement

वाघोलीतील उबाळेनगर परिसरात आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस प्रा. लि. गोदामातील कामगाराने एक कोटी नऊ लाख रुपयांचे २८० लॅपटॉप चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीतील कामगार सुरेश कुमारने साथीदारांच्या मदतीने लॅपटाॅप चोरल्याची माहिती तपासात मिळाली होती. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजित फरांदे तांत्रिक तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन टेम्पो जप्त करण्यात आले. गोदामातून चोरलेल्या लॅपटॉपची आरोपींनी नऊ जणांना विक्री केल्याचे उघडकीस आले. आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायने दिले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page