बिश्नोई गँगने स्वीकारली सिद्धिकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर राजकीय आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. काल रात्री (दि.12) मुलाच्या झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हल्ला करण्यात आला. तीन हल्लेखोरांनी त्यांच्या तीन चार राऊंड फायर केले. त्यांच्या छातीवर गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. निर्मल नगर परिसरामध्ये हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला. या घटनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. त्यासंबंधीत एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली याचं कारण सांगणारी एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच, या हत्येसाठी अभिनेता सलमान खान हा जबाबदार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगने म्हटलं की, “ओम जय श्री राम, जय भारत, मला जीवनाचं सार समजतं आणि संपत्ती आणि शरीराला मी धूळ समजतो. मैत्रीच्या कर्तव्याचा सन्मान करत मी जे योग्य होतं तेच केले.

Advertisement

सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. आज बाबा सिद्दीकी यांचा शालीनपणाचा सागर संपला आहे किंवा एकेकाळी त्याच्यावर दाऊदसोबत मकोका होता. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याचे दाऊद आणि अनुज थापन यांच्यासोबत बॉलिवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहाराशी असलेले संबंध.

आमचं कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र, सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करणारा जो कोणी असेल त्याने तयार राहावे. जर कोणी आमच्या भावांना मारले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. आम्ही कधीच पहिला वार करत नाही. जय श्री राम, जय भारत, शहीदांना विनम्र अभिवादन.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page