रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग, पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे – रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना पर्वती परिसरातील जनता वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..

Advertisement

तक्रारदार महिलेची मुलगी शाळेतून रिक्षाने घरी निघाली होते. त्यावेळी रिक्षाचालकाने आरशातून मुलीकडे एकटक पाहून तिला इशारा केला. त्यानंतर मुलगी पु्न्हा शाळेत निघाली. रिक्षाचालकाने तिचा पाठलाग केला. मुलीला जनता वसाहत पोलीस चौकीसमाेर काही अंतरावर अडवले. तू मला आवडते. आपण पळून जाऊन लग्न करू, असे त्याने मुलीला सांगितले. रिक्षाचालकाच्या त्रासामुळे घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंग, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page