ड्रायव्हर नसतानाही टेम्पो रिव्हर्सने सुसाट; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात अपघाताच सत्र सुरुच आहे, दररोज अपघाताच्या वेगवेगळ्या भागात घटना घडत आहेत. असं असतानाच आता पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हडपसर भागातील वैदूवाडी उड्डाण पुलावरचा प्रकार समोर आला आहे. पुणे मनपाच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीच्या चारचाकी टेम्पोत ड्रायव्हर नसतानाही टेम्पो रिव्हर्सने जोरात पाठीमागे जात आहे. या विचित्र घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.
अत्यंत भयंकर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. टेम्पो एवढ्या स्पीडने रिव्हर्स गेला कसा, याची माहिती अजून मिळालेली नाही. रस्त्यावरील डिव्हायडरवर हा टेम्पो धडकल्यामुळे पुर्णपणे थांबला. या विनाचालक धावणाऱ्या टेम्पोचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने बाईकवरुन जाणाऱ्या लोकांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. मात्र घडलेल्या प्रकरणाची चौकशी होणं अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिका या प्रकरणावर काय कारवाई करणार हेही पाहणं महत्वाच ठरणार आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




