कन्हेरगांव येथे दिवसा ढवळ्या चोरी 17 तोळे सोन्या सह चांदीच्या दागिन्यांवर डल्ला..!

कन्हेरगांव येथे दिवसा ढवळ्या चोरी 17 तोळे सोन्या सह चांदीच्या दागिन्यांवर डल्ला
ता माढा – कन्हेरगांव निमगाव रस्त्यावरील विजय माने सर यांच्या बंद घराचा लोखंडी दरवाजाची कडी कापून घरातील बेड रूमच्या कपाटातून अंदाजे एकूण 8 लाख 38 हजार किंमतीचे 17 तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरांनी लंपास केला आहे हि घटना दि 10 एप्रिल दुपारी 1.45 ते 2.15 च्या दरम्यान घडली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करण्यात आली आहे व या संदर्भात माने यांच्या पत्नी सौ अनिता माने यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करुन पोलीसांनी 3 अज्ञात इसमां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय बिभिषण पाटील हे निमगाव येथून कन्हेरगांव कडे जात असताना पाहुण्यांना भेटून जायाचे असल्याने ते घरी आले होते यावेळी घरातून बाहेर पडताना 3 युवकांना पाहिले परंतु कोणीतरी नातेवाईक भेटायला आले असतील म्हणून घराच्या पायऱ्या वरुनच एवढेच विचारले की सर आहेत का त्यातील एका तरुणाने मराठी भाषेत शिवी दिली व तिघे जण पोर्च मधील ग्रील वरुन उड्या टाकून (यमाहा कंपनीच्या) मोटारसायकल वर बसून अत्यंत वेगाने निमगावच्या दिशेने पळून गेले हे लक्षात येताच दु 2.18 मि विजय माने यांना फोन करून चोरी झाल्याचे सांगितले विजय माने सर हे अकोले (खु) या ठिकाणी शाळेत शिक्षक असून त्यांच्या पत्नी सौ अनिता माने ह्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत व त्या दिवशी शेतात केळीच्या बागेतील कामगारांना पिण्याचे पाणी घेवून गेल्या होत्या याचा फायदा घेऊन चोरी करण्यात आली आहे या चोरीत 25 तोळे सोन्याचे दागिने व 10 जोड पैंजण 10 जोड जोडवी असा ऐवज लंपास केला आहे परंतु काही दागिन्यांच्या खरेदी पावत्या घरामध्ये उपलब्ध नसल्याने फिर्यादीत 17 तोळेचा उल्लेख करण्यात आला आहे व पावत्या उपलब्ध झाल्यास त्याची फिर्यादीत नोंद घेणार आहेत अशी माहिती सौ माने यांनी दिली आहे
अशा दिवसा ढवळ्या चोरी मुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करण्यासाठी जायचं का नाही असा प्रश्न निर्माण झाला असून या चोरीचा तपास जलद गतीने करावा अशी मागणी ग्रामस्थ करित आहेत तसेच कन्हेरगांव शिवारात बिबट्या फिरताना दिसत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे परंतु खरोखरच बिबट्या आहे का याची सुध्दा शहानिशा करण्यात यावी तसेच बिबट्याच्या नावाखाली अशा चोऱ्या होत आहेत का हे ही पाहणे गरजेचे आहे




