घरफोडी सारख्या गंभीर गुन्हयात ३ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद..!

दि.१७/०१/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सकटे, मुंढे, कारखिले युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय माहीती मिळाली की, लोणी काळभोर पो.स्टे. गु.र.नं. ४२६/२०२१ भा.द.वि. कलम ४५७,३८० अन्वये दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे दत्ता शाम गिरी वय २२ वर्ष रा.बिराजदार हडपसर पुणे हा बिराजदार नगर कॅनॉल लगत असनाऱ्या रोड वर उभा आहे सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दत्ता शाम गिरी असे असल्याचे सांगीतले. नमुद इसम हा पाहिजे आरोपी असल्याचे खात्री करुन त्यास गुन्हयाचे पुढील तपासकामी लोणीकाळभोर पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, यांनी केली आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




