मोक्का सारख्या गंभीर गुन्हयांतील ०८ महिन्यापासून फरार आरोपीस केले जेरबंद..!

मा. वरिष्ठांनी गंभीर व मोक्का गुन्हयामधील पाहिजे आरोपी यांना अटक करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने निलेश घायवळ टोळीवरील मोक्का केस मधील कोथरुड पोलीस स्टेशन १) गु.र.क्र. २५०/२०२५ भा.न्या.सं.क. १०९, ३५२, ३५१, १८९(१), १८९ (४), १९१(२), १९०, १११ (२),६१ (२),४९,३ (५) सह आर्म अॅक्ट ३,,२५,२७ सह मोक्का कायदा ३(१) (ii), ३ (२), ३ (४), २) गु.र.क्र. २५१/२०२५ भा.न्या.सं.क. १०९,३५२,३५१,१८९ (१),१८९ (४),१९१ (२), १९०,१११(२),६१ (२),४९,३ (५) सह आर्म अॅक्ट ३,४,२५ सह मोक्का कायदा ३(१) (ii), ३ (२), ३ (४) या दोन गुन्हयांमध्ये ८ महिन्यापासुन फरार असलेला पाहिजे आरोपी नामे गुरूदत्त गुणाजी साळवे, वय ४४ वर्षे, रा. स.न. १८/१९, आशिष गार्डन जवळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरुड पुणे यांच्याबाबत केलेल्या तांत्रिक व गोपनीय तपासामध्ये युनिट ३ गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार संदिप शेळके यांनी गोपनीय बातमीदारामार्फत केलेल्या तपासात सदर आरोपी हा स्वतःचे आस्तित्व व ओळख लपवून तालुका सांगोला जिल्हा सोलापुर येथे राहत असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त केली.

Advertisement

सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या पुर्व परवानगीने आरोपीबाबत पुढील कारवाई करण्याकरिता युनिट ३ कडील पोलीस उप-निरीक्षक गणेश फरताडे, पोलीस अंमलदार मारूती पारधी, संदिप शेळके, अतुल साठे व वाघस्कर यांचे पथक तात्काळ सोलापूर या ठिकाणी रवाना झाले. सदर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सलग दोन दिवस आरोपीचा पाठलाग करुन गाव निजामपुर तालुका सांगोला जिल्हा सोलापुर येथून शिताफीने ताब्यात घेवुन आरोपीस सुरक्षितपणे पुणे येथे आणुन त्यास पुढील कारवाईसाठी सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा १ यांचे समक्ष हजर केल्याने त्यांनी सदर आरोपीचा कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.क्र. भा.न्या.स. कलम १०९ व इतर सह मोक्का गुन्हयांचे तपासकामी ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. विवेक मासाळ, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक गणेश फरताडे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, मारूती पारधी, अमोल काटकर, संदिप शेळके, मो. हनिफ शौकत शेख, कैलास लिम्हण, अतुल साठे, महेंद्र तुपसौंदर, अर्चना वाघमारे, अनुष्का जगदाळे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे, विपुन गायकवाड यांनी केली आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page