महिलांची छेडछाड करुन विनयभंग करणा-या व ०१ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणा-या आरोपीस केले जेरबंद..!

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेश पार्क, लोहगांव, पुणे येथे दुचाकीवर येवुन एका अज्ञात इसमाने अल्पवयीन पिडीतेचा विनयभंग केल्याने विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६२४/२०२५, भा.न्या.सं. क. ७४,७५ सह लैंगिक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यापुर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेणेबाबत आदेशित केले होते.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला होता. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, राहुल जोशी यांनी घटनास्थळा वरील व आजुबाजुचे आरोपीचे मार्गावरील विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी, भोसरी या भागातील तब्बल २४५ सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करुन यातील आरोपी नामे सागर राम सोनवणे वय २२ वर्षे रा. हनुमान कॉलनी ६ नंबर, सर्व्हे नंबर १८६, शास्त्री चौक रोड, भोसरी, पुणे याचा शोध घेवुन त्यास शिताफिने सापळा लावुन ताब्यात घेतले. नमुद आरोपी याचेकडील तपासामध्ये आरोपी याने विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये एकुण ०५ विनयभंगाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्य पोलीस स्टेशन हद्दीतही त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी हा रात्रीचे वेळी सुनसान रस्त्यावर महिलांची छेडछाड करुन मोटार सायकलवरुन पळुन जायचा व सी.सी.टी.व्ही. मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायचा. नमुद आरोपीस सदर गुन्हयामध्ये दि.०७/१२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परि ०४ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस उप-निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, गणेश इथापे दादासाहेब बर्डे, सागर कासार, पांडुरग म्हस्के, सना शेख व आसमा शेख यांचे पथकाने केली आहे.




