परराज्यातील आरोपीकडुन ५.२९० किलोग्रॅम वजनाचे अफु बोंडे/टरफलेचा नशाकारक..!
अंमली पदार्थ जप्त

दि.२६/०८/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीन निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, किरण साबळे असे पेट्रोलींग करीत असताना नॅन्सी लेक होम सोसायटीकडुन लेकटाऊनकडे जात असताना पदमजा पार्क सोसायटीचे भिंतीलगतच्या रोडवर आरोपी नामे मांगीलाल पुनाराम रहाड, वय २९ वर्षे, रा. सध्या अप्पर इंदीरानगर, बस डेपो समोरील चाळीमध्ये, बिबवेवाडी, पुणे मुळ गाव करवाडा, तहसील राणीवाडा, जि. जालौर, राजस्थान हा त्याचे ताब्यात पोत्यामध्ये ९५,२२०/- रुपये किंमतीचा ५.२९० किलोग्रॅम वजनाचे अफु बोंडे/टरफलेचा नशाकारक अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळून आला आहे त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३९३/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १८ (ख) अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास नमुद गुन्हयात सदर इसमास अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जितेंद्र कदम यांचे सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, किरण साबळे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.




