विधीसंघर्षित बालकाकडुन वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस..!

दि.०७/०५/२०२५ रोजी मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शन प्रमाणे युनिट ०५ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण यांचे आदेशान्वये युनिट ५ कडील पोलीस अंमलदार पुणे शहर कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत फिरत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना मिळालेल्या बातमीवरुन त्यांनी एका विधीसंघर्षित बालकास त्याचे पालकासह युनिट कार्यालय येथे आणुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन खालील नमुद वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) हडपसर पोलीस पो.स्टे. नंबर ३५६/२०२५ भारतीय बी.एन.एस कलम ३०३ (२)
२) हडपसर पोलीस पो.स्टे. नंबर २४७/२०२५ बी.एन.एस कलम ३०३ (२)
३) हडपसर पोलीस पो.स्टे. नंबर ४०७/२०२५ भारतीय बी.एन.एस कलम ३०३ (२)
४) काळेपडळ पोलीस पो.स्टे. नंबर ५०/२०२५ भारतीय बी.एन.एस कलम ३०३ (२)
५) सिंहगड रोड पोलीस पो.स्टे. नंबर २१४/२०२५ भारतीय बी.एन.एस कलम ३०३ (२)
असे एकुण ५ वाहन चोरीच्या गुन्ह्यातील एकुण १,८०,०००/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सपोनि. विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार राजस शेख, शहाजी काळे, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, विनोद शिवले, विनोद निंभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शुभांगी म्हाळसेकर यांचे पथकाने केली आहे.




