जुगारचालकावर कारवाई करुन जुगार अड्डयाचा केला बिमोड..!

लोणी काळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अवैध धंद्दयावर करवाई करण्याची मोहिम सुरू केली होती या मोहिमे दरम्यान दि.२७/०१/२०२५ रोजी बेट वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे येथे रेकॉर्डवरील सराईत जुगार चालक नामे माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर निवृत्ती राखपसरे हा बेकायदेशीररित्या मटका / जुगार घेत असल्याची बातमी प्राप्त झाली. सदर बातमी प्राप्त होताच त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे श्री. राजेंद्र पन्हाळे यांनी स्वतः व पोलीस स्टाफ यांचेसह सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर आरोपी नामे १) माऊली निवृत्ती राखपसरे वय ४० वर्षे रा. २) किशन शाहु टिंगरे वय ३९ वर्षे रा. ३) बालाजी धर्मराज माने वय ३३ वर्षे रा. याचे कडुन एकुण ४५५०/-रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करणेत आले आहे. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.५ पुणे श्री. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे श्री. राजेंद्र पन्हाळे पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव पोलीस अंमलदार विर, पाटील, कुदळे, कर्डीले यांनी केली आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




