दारू पिताना झालेल्या वादातून बांधकाम मजुराला बेदम मारहाण; बांधकाम मजुरांवर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता बायको-मुलांचा चांगला सांभाळ करीत नाही’, असे बोलल्याने दोघांनी मित्राला बेदम मारहाण केली. खराडी परिसरात तिघेही दारू पिताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला.

बोधू शेख असे जखमी झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत देवलाल राजमुनी सिंग (वय २२) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रमोद परमेश्वर भुईया (वय २९) आणि मुकेशकुमार राजेश्वर मेहता (वय २६, दोघे रा. बोराटेनगर, खराडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे बांधकाम व्यवसायातील कामगार आहे. लेबर कॅम्पमधील घरात ते रहातात. फिर्यादी हे जेवण करुन त्यांच्या रुममध्ये मोबाईल पहात होते. आरोपी प्रमोद, मुकेशकुमार आणि बोधु शेख हे दारु पित बसले होते. यावेळी बोधु शेख हा प्रमोद भुईयां याला म्हणाला की, तुम तुम्हारे बीवी और बच्चो को अच्छा खाना नही खिला पिला सकता तो शादी क्यु बनाया, असे म्हणाला. त्याचा राग आल्याने त्यांनी हाताने बोधु शेख याच्या तोंडावर रक्त येईपर्यंत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी बोधु शेख याला रुमच्या बाहेर ओढत आणले. रुमच्या समोर असलेल्या जागेत नेऊन त्यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मुकेशकुमार याने पायातील चामड्याच्या बुटाने तोंडावर जोरात लाथा मारल्या. प्रमोद भुईयां याने हाताने व बुक्क्यांनी त्याच्या डोक्यात, डोळ्याला, कानाला व हनुवटीस दुखापत केली. पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करीत आहेत
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




