जिवंत राहायचे असेल तर…; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

मुंबई – काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई टोळीकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी सातत्याने मिळत आहे. आजही मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका संदेशाद्वारे सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत वरळी पोलीसांत गुन्हा दाखल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागच्या काही दिवसांत सलमान खानला बिश्नोई टोळीकडून तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर याच आठवड्यातील ही दुसरी धमकी आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री धमकीचा हा संदेश आला असून, त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. संदेश पाठविणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. “सलमान खानला जर जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी आणि पाच कोटी रुपये द्यावेत. जर त्याने असे केले नाही, तर आम्ही जिवंत सोडणार नाही. आमची टोळी अजूनही सक्रिय आहे”, अशा आशयाचा संदेश वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page