बारामतीमध्ये बोगस मतदान? युगेंद्र पवार यांच्या आईचा मोठा दावा!

माझ्यासमोर एका व्यक्तीनं मतदान केंद्रावर दमदाटी केली. तो जणूकाही स्वत:च्या घरचं लग्न असल्यासारखं या, बसा वगैरे सांगत होता. खाणाखुणा करून मतदारांशी बोलत होता. काय संकेत देत होता माहिती नाही. आम्ही आक्षेप घेतला आणि असं न करण्याची विनंती केली. आमचा मोहसीन त्यांना तेच सांगत होता. पण त्याला त्यांनी धमकी दिली. मग पोलिसांनी त्यांना लगेच बाहेर काढलं. पोलिसांचं सहकार्य होतं. मग मी बाहेर आले. तिथे गेटच्या बाहेर आतल्या व्यक्तीचा मोठा भाऊ म्हणाला, “तुला मी बघून घेईन”.. ते कुणाचे कार्यकर्ते होते माहिती नाही, पण नक्कीच घड्याळाचे होते हे मी सांगू शकते. मी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत आहोत. आता ते सीसीटीव्ही फूटेज डिलीटही केलं जाण्याची भीती आम्हाला वाटत आहे – युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांचा आरोप…

Advertisement

संपादक -आरतीताई बाबर 8830914142.

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page