शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद..!

वानवडी पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील गुन्हेगार महेश विकास शिंदे, वय- १९ वर्षे, रा. स.नं.११०, आदिनाथ सोसायटी समोर, रामटेकडी, हडपसर, पुणे. सध्या रा. गल्ली नं. ४ आंबेडकर नगर, बाळु नामदेव शिंदे यांचेकडे भाडयाने, मार्केटयार्ड, पुणे. याचे विरूध्द यापुर्वी शरीराविरूध्दचे व मालमत्तेविरूध्दचे एकुण एकुण ०४ गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असुन त्यामध्ये संगनमत करुन बेकायदेशीर जमाव जमवुन त्यात हत्यारासह सामिल होवुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, तोडफोड करुन सार्वजनिक मालमत्तेचे तसेच नागरीकांचे मालमत्तेचे नुकसान करणे, दुखापत करुन मारहाण करुण मारण्याची धमकी देवुन परिसरात दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांचा समावेश आहे.

गुन्हे दाखल १) वानवडी पो.स्टे २२१/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ११८ (१),१८९(२), १९०, १९१(१), १९१(२), १९१(३), ३५१(२) भारतीय हत्यार कायदा सन १९५५ चे कलम ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ २) वानवडी पो.स्टे ३५३/२०२५ भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११५ (२) १८९(२), १९०, ३५१(२), ३५२ क्रिमीनल लॉ अमेंन्डट कलम ७ प्रमाणे ३) वानवडी पो. स्टे ३६४/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम- ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ ४) वानवडी पो.स्टे ४२५/२०२५भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९ (४), ३०८ (२), ३३३, ११५(२), ३५१(२) आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महा. पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३७, क्रि. लॉ.अ. अॅ. कलम ७ अन्वये

Advertisement

दाखल गुन्हयांचे तपासामध्ये यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार याने वारंवार गंभीर गुन्हे करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवीत असुन तो समाजासाठी धोकादायक व्यक्ती असलेचे तपासामध्ये निदर्शनास आलेने आहे. त्याचे वरील गुन्हयांचा सखोल आढावा घेवुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५५) (सुधारणा १९९६) (सुधारणा २००९) सुधारणा २०१५ चे कलम ३ प्रमाणे ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत प्रस्ताव पाठविला असता मा. पोलीस आयुक्त, सो पुणे शहर यांचे कडील आदेशान्वये ०१ वर्षे स्थानबध्द करुन मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ठेवणेबाबत आदेश केले आहेत. त्यास ताब्यात घेवुन अमरावती जेल येथे रवाना करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ-५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर श्रामती नम्रता देसाई, यांचे मार्गर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता जाधव पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक शेखर मोकाटे, व पोलीस अमलदार पांडुरंग कदम, राहूल माने, यतिन भोसले, शितल आखाडे यांनी केली.

σ

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page