मतमोजणी दरम्यान ध्वनी प्रदूषण करणा-या ‘बुलेट राजा’ वर पोलीसांची कारवाई..!

पुणे महानगरपालिका निवडणूक सन २०२६ अनुषंगाने दिनांक १६.०१.२०२५ रोजी साधना विद्यालय, हडपसर, पुणे येथे मतमोजणी प्रक्रियेसाठी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर मतमोजणी दरम्यान काही उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त यांनी जाणीवपूर्वक मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये अनधिकृत बदल करून ध्वनी प्रदूषण करणारा मोठा व कर्कश आवाज निर्माण केला, तसेच कर्कश हॉर्न वाजवून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारांमुळे मतमोजणी ठिकाणी गोंधळ व तणाव निर्माण होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली होती.

पोलीस बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ व प्रभावी कारवाई करत एकूण १९ मोटारसायकल (त्यामध्ये बुलेट, यामाहा इत्यादी वाहनांचा समावेश आहे) ताब्यात घेतल्या असून संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई अंतर्गत उल्लंघन करणा-या संबंधितांकडून एकूण रुपये ९६७००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Advertisement

वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणे, कर्कश हॉर्नचा वापर करणे अथवा सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे कृत्य करू नये असे याद्वारे पोलीस विभागाकडून तरूणांना आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि-६ डॉ राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोनि. (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे, आकाश धावडे, विजय कानेकर, धिरज शेलार, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page