मनोज जरांगे पाटलांचं अखेर ठरलं! विधानसभा निवडणूकीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

जालना – मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसंच ज्यावेळी मी सांगेन तेव्हा अर्ज मागे घ्यायचा असंही त्यांनी सांगितलं आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
जिथे निवडून येईल तिथे उभा करू. SC, ST चा आपल्या विचारांचा उमेदवार निवडून देऊ. आपल्या मागण्या मान्य असल्याचं जो उमेदवार स्टॅम्पवर आपल्याला लिहून देईल त्याला पाठिंबा देऊ. कोणत्या मतदारसंघात उभं करायचं हे मी दोन ते तीन दिवसात मतदा संघ सांगतो. तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो. ज्यावेळी मी सांगेन की अर्ज मागे घ्यायचा. आपण चौफेर वार करायचा आहे. यांची चिरफाड अशी करावी लागणार आहे. अर्ज काढून घे म्हटलं तर नाराज व्हायचं नाही. ज्यांनी मराठ्यांना संपलं त्यांना संपवायचंच गप्प बसायचं नाही. आता तुम्ही फॉर्म भरून या तुमचे पैसे बुडणार नाहीत काढून घे म्हटलं की तुमचे पैसे वापस येतील. नंतर आपण मेरीटनुसार ठरवू, असंही मनोज जरांगे म्हणालेत.
जिथे निवडून येऊ शकतात त्याच ठिकाणी उभा करावेत. SC आणि ST च्या जागेवर आपण उमेदवार देऊ नये. तो कोणत्याही पक्षाचा असो आपल्या विचाराचा असला की लाखभर मतदान फुकट द्यायचा आणि निवडून आणायचा. ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येत नाहीत. त्या ठिकाणी जो आपल्याला 500 रुपयांच्या बॉण्ड वर लिहून दे. जो तुमच्या मागण्याशी संमत आहे. त्यालाच मतदान करा, असं मनोज जरांगे म्हणालेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




